Purandar | रस्त्याच्या वादातून महिलेला शिवीगाळ आरोपींविरुद्ध ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल

 

                पुरंदर रिपोर्टर Live 

   

सासवड. दि. ७ प्रतिनिधी 

                             सासवड येथील गट नंबर ७३/७ मधील रस्त्यावरून प्रवेश नाकारणाऱ्या व खाटीक समाजाच्या महिलेला जातीवाचक शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या संशयित आरोपी मोहन हरिचंद्र जगताप, किशोर बबन जगताप, प्रल्हाद तुकाराम नागरगोजे, कुणाल प्रल्हाद नागरगोजे, धर्मेद्र उर्फ काका कुंभारकर या पाच जणांविरुद्ध फिर्याद पुजा कमलाकर घोडके यांनी सासवड पोलीस स्टेशन ठाण्यात दिली 


               विजय  घोडके यांनी सुमारे २५ वर्षापूर्वी गोरख भगवान विटकर यांच्याकडून गट क्रमांक ७३/७ मधील दोन गुंठे जागा खरेदी केली होती व त्यावर त्याचे कुटुंब विटकर चाळ नावाच्या परिसरात घर बांधून राहत असून तेथे त्याचा उदरनिर्वाह सुरू आहे त्यांच्याजवळील रहिवासी पुजा विजय धोत्रे व जयश्री राजेंद्र धोत्रे आहेत या जागेवरील रस्ता गेल्या सहा महिन्यांपासून वादात आहे हा वाद तहसील कार्यालय सासवड येथे असून ३१जुलै रोजी सकाळी १० वाजता तहसीलदार विक्रम रजपूत यांनी स्थळपाहणी केली त्यांनी सांगितले की कोणालाही कायदेशीर रस्ता अडवता येणार नाही परंतु तहसीलदार निघून गेल्यावर मोहन हरिचंद्र जगताप, किशोर बबन जगताप, प्रल्हाद तुकाराम नागरगोजे, कुणाल प्रल्हाद नागरगोजे, धर्मेद्र उर्फ काका कुंभारकर या पाच जणांनी महिलेस विरोध केला शेजारील पुजा विजय धोत्रे व जयश्री राजेंद्र धोत्रे यांनाही रस्त्यावरून जाण्यास मनाई करीत दमदाटी केली पिडीत कुटुंब भयभीत असून आरोपीकडून जीवितास धोका असल्याचा दावा त्यांनी केला आहे.पुढील तपास सासवड पोलिस करीत आहेत.





Post a Comment

0 Comments